Vat Purnima Ukhane हे खास महिलांसाठी लिहिले गेले आहेत. वटपौर्णिमा हा सण हिंदू धर्मातील एक मोठा सण मानला जातो. जून महिन्याच्या सुरुवातीलाच हा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमेला महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हे व्रत ठेवतात. या सणानिमित्त महिला वडाच्या झाडाची पूजा करतात त्याला धागे गुंडाळतात म्हणजेच झाडाला फेरे घेतात.
या दिवशी भरपूर ठिकाणी कार्यक्रम देखील आयोजित केले जाते. खास करून महिलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवले जातात. आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा.
1- वट पौर्णिमा आहे, हिंदू धर्मातील मोठा सण,
_______________ रावांशिवाय, लागत नाही माझे मन.
2- वट पौर्णिमेचा, महिना आहे ज्येष्ठ,
____________ रावांचे नाव घेते, ते आहेत फार श्रेष्ठ.
3- वटवृक्षाच्या झाडाला, प्रदक्षिणा घातल्या सात,
_______________ रावांची असुदे मला, ७ जन्माची साथ.
4- यावर्षी वटपौर्णिमेची तारीख आहे, १० जून,
____________ रावांचे नाव घेते, मी सावंताची सून.
5- वटपौर्णिमेच्या दिवशी, आपण सर्वांनी लावूया झाडे,
_______________ रावांचे नाव घेते, त्यांचे दीर्घायुष्य वाढे.
6- यांच्यासोबत माझे लग्न होऊन, पूर्ण झाली ईच्छा,
__________ रावांचे नाव घेते आमच्याकडून सर्वांना, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
7- जून महिना म्हणजे, वटपोर्णिमेचा हा पहिला सण,
_____________ रावांनी जिंकले माझे, पहिल्या भेटीतच मन.
8- आज वाट पौर्णिमेचा सण म्हणून, मी नेसली सुंदर साडी,
______________ रावांचे नाव घेते, मला आवडली सावंताची वाडी.
9- वटपोर्णिमा म्हणजे, महिलांचा आवडता सण,
____________ रावांचे नाव घेते, खुश असुदे आपण सर्वजण.
10- परिवाराच्या आशीर्वादाने, बांधली आम्ही लग्नाची गाठ,
______________ रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी, वडाला फेरे मारते सात.
