Engagement Ukhane हे खास करून महिला आणि पुरुषांसाठी लिहिले गेले आहेत. लग्नाच्या आधी साखरपुडा केला जातो आणि यामध्ये देखील काही जण उखाणे घेतात. उखाणे म्हटले की सर्वजण फार उत्सुक असतात ते ऐकण्यास. त्यामुळे आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला नवीन प्रकारचे उखाणे देण्याचा आणि प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा.
1- आज साखरपुड्यासाठी, पाहुणे मंडळी दाटली,
______________ रावांचे नाव घेते, अखेर त्यांना अंगठी घातली.
2- आमच्या साखरपुडयाची, सर्वाना होती घाई,
_________________ रावांचे माझ्यासाठी स्थळ आणले, धन्यवाद सासू आई.
3- आज साखरपुडा म्हणून, हिरवा चुडा घातला हाती,
_______________ रावांचे नाव घेते, तेआहेत माझे ७ जन्माचे जीवनसाथी.
4- स्थळ खूप आले, पण मी हिलाच निवडली,
सर्वांचं म्हणण आहे ________________ आणि ___________ची जोडी खुप आवडली.
5- साखरपुडा म्हणून घातला हातात, हिरवा चुडा,
_________________ रावांचे नाव घेते, फोडा आता पेढ्यांचा पुडा.
6- सर्वजण म्हणतात हा आहे लक्ष्मीनारायणाचा जोडा,
____________ रावांचे नाव घेते, आज आहे आमचा साखरपुडा.
7- लग्नाच्या आधी, पार पडतो साखरपुडा,
______________ रावांच्या नावाचा भरलाय मी, हातात हिरवा चुडा.
8- सर्वांचा आवडता आहे हा आमचा जोड,
_______________ रावांचे नाव घेते, करा सर्वांचे तोंड गोड.
9- मी आहे यांची Queen आणि हे आहेत माझे King ,
आज आमचा साखरपुडा म्हणून___________ रावांच्या नावाची मी घातली Ring.
10- मुलींच्या माहेरी, साखरपुडा करण्याची आहे प्रथा,
_______________ रावांसोबत सुरु होईल आता, माझ्या संसाराची कथा.
