Marathi Ukhane for Bride हे खास नवीन वधूसाठी लिहिले गेले आहेत. उखाणे घेणे हि आपल्या महाराष्ट्राची परंपरा खूप वर्षांपासून चालत आलेली आहे. उखाणे म्हंटले कि सर्व पाहुणे अगदी आनंदाने उखाणे ऐकण्यास उत्सुक असतात. तर असेच आम्ही नवीन नवीन उखाणे या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर नक्कीच आपल्या मित्र परिवारांसोबत शेयर करा.
1- आई वडिलांच्या आशीर्वादाने, जुळून आल्या रेशमी गाठी,
____________________ रावांचे नाव घेते, खास तुमच्या सर्वांसाठी.
2- आज अंगणातल्या मातीलाही, सुचती गाणी,
_________________ राव माझे राजा, आणि मी त्यांची राणी.
3- मिटले आज, एकमेकापासूनचे मोठे अंतर,
____________ राव घेतली काळजी, माझ्या आई वडिलानंतर.
4- आई-वडिलांशिवाय, कोणी नाही कोणाचे,
_____________ रावांचे नाव घेते, त्यांच्यामुळे दिवस आले सुखाचे.
5- ज्योत जळण्यासाठी, त्याला सोबत लागते वात,
______________ रावांचे नाव घेते, त्यांची साथ जन्माची भेटूदे मला साथ.
6- सात फेरे आज आम्ही घेतले, अग्नीच्या ज्वालावर,
_____________ रावांचे नाव घेते, मी नाचवेल त्यांना माझ्या तालावर.
7- हिरवा चुडा, घातलाय माझ्या हाती,
_____________ राव आहेत, माझ्या जीवनाचे साथी.
8- प्रेमात ह्यांच्या पडून, झाले मी सेफ,
____________ रावांचे नाव घेते, मी जाधवांची लेक.
9- सारून बाजूला स्थळे खूप, तू दिलासा हातात हात,
_____________ रावांचे नाव घेते, तुमची ७ जन्मी अशीच असुदे साथ.
10- ओढ होती एकमेकांची, म्हणून होतो सोबती,
सर्वांचे म्हणणे आहे _________ आणि ___________ ची जोडी छान शोभती.

11- अनोळखी शहरात, भेटली यांची मला साथ,
__________ आयुष्यभरासाठी द्या आता, माझ्या हातात हात.
12- एक दिवस तुम्हाला बघितल, आणि प्रेमाची घंटी वाजली,
सगळ्यांच म्हणण आहे, ________आणि ____________ची प्रेम कहाणी खुप गाजली.
13- तुमच्यामुळे माझ्या आयुष्याला, आहे आज अर्थ,
_____________ राव भेटले नसते तर, गेल असत व्यर्थ.
14- नशिबवान आहे मी, यांच्याशी झाले माझ लग्न,
______________ राव होतील आता, माझ्यासोबत संसारात मग्न.
15- माझ्या नावाचा टॅटू काढून, दाखवली यांनी प्रेमाची खून,
______________ रावांचे नाव घेते, मी ___________ घराण्याची सून.