हळद लावते थोड़ी कुंकु लावत ठसठशीत पती मिळाले ***** रावांन सारखे हेच माझे पूर्व संचित
महादेवाच्या मंदिरात वाहते बेलाचे पाण हळदीला करते सुरवात राखून सर्वांचा मान
नवस केला देविला फ़ुल आणि नारळ वाहीन ***** रावांचे नाव घेते हळद लावती बहींन
आज आहे लग्नाचा दिवस तैयारी केली घाईने ***** रावांचे नाव घेते हळद लावली आईने
रुसलेली राधा कृष्ण म्हणतो हास ***** रावांचे नाव घेते हळदीच्या दिवशी खास
राम लक्ष्मण जानकी हनुमान आहें दास ***** रावांच नाव घेते हळदीच्या दिवशी खास
दिवस आहे लग्नाचा मदत केली सर्व गावाने नाव घेते रावांचे हळद लावली भावानें
दत्ताची आहें गाय, महादेवा आहे नंदी ***** रावांनीं लावली हळद झाले मी आनंदी
माता सीतेला दीसले सोन्याचे हरीण ***** रावांचे नाव लावली हळद आता सुखाने संसार करिन
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने ***** रावानीं लावली हळद पती या नात्याने
बाग़ेची निगरानी करतो माळी ***** रावांचे नाव घेते हळदीच्या वेळी
Leave feedback about this